मंगळवार, 2 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

दहशतवादी हल्ल्यात जखमी महिलेने दिला बाळाला जन्म

Rifleman Nazir Ahmed
जम्मू - सुंजवान लष्करी तळावर दहशतवाद्यांनी चढवलेल्या हल्ल्यात 6 जवान शहीद झाले. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात एक गर्भवती महिलाही जखमी झाली होती. या महिलेने रुग्णालयात बाळाला जन्म दिला आहे.
 
लष्करी अधिकार्‍याप्रमाणे गोळीबारात रायफलमॅन नाझिर अहमद आणि त्याची गर्भवती पत्नी गंभीर जखमी झाली. त्यांना सतवारी येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी मोठ्या प्रयत्नाने महिलेचे प्राण वाचवले आणि अश्या परिस्थितीत बाळाला वाचवण्याचेही प्रयत्न सुरु केले. अखेर महिलेचे सीझेरियन सेक्शन ऑपरेशन करण्यात आले. महिलेने मुलीला जन्म दिला असनू दोघांची प्रकृती स्थिती आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.