रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 17 जुलै 2017 (16:32 IST)

पाकचा गोळीबार, चिमुरड्यांचा मृत्यू, एक जवान शहीद

सोमवारी सकाळपासून पाकिस्तानने दोन वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकच्या गोळीबारात एक जवान शहीद झाला असून सीमारेषेवरील गावात राहणाऱ्या सात वर्षांच्या चिमुरडीचाही या गोळीबारात मृत्यू झाला आहे.

राजौरी सेक्टरमध्ये पाकच्या गोळीबारात सैन्यात नाईकपदावर काम करणारे मुद्दासह अहमद हे शहीद झाले. अहमद हे जम्मू- काश्मीरच्या त्राल भागातील रहिवासी होते. अहमद यांना दोन मुले आहेत. पूंछमध्येही पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात सात वर्षांच्या साजिदा काफीलचा मृत्यू झाला. पूंछमधील बालाकोट येथे साजिदा आणि तिचे कुटुंबीय राहत होते.