बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शेतकर्‍यांवरील गोळीबार हे असंवेदनशीलतेचे संकेत: अण्णा हजारे

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात घोटण येथील शेतकऱ्यांवरील गोळीबार हे सरकारच्या असंवेदनशीलतेचे संकेत असल्याचे अण्णा हजारे यांनी नमूद केले. शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्याऐवजी त्यांच्यावर विशेषत: त्यांच्या शरीराच्या वरच्या भागावर गोळीबार करणे हे अतिशय निषेधार्य आहे ही घटना लोकशाहीला काळीमा फासणारीच असल्याचेही ते म्हणाले.
 
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी घोटण येथील गोळीबारात जखमी झालेले उद्धव मापारी (३२) आणि बाबूराव दुकळे (४५) या घोटण या आंदोलनकत्र्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी मॅक्सकेअर हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. अण्णा हजारे यांनी केंद्रातील सध्याच्या भाजप सरकारवर टीका केली. ते म्हणाले की भ्रष्टाचार आणि गरिबी निर्मूलन करण्याचा दावा करणारे सरकार आपली क्षमता सिद्ध करू शकत नाही. त्यांनी संसदेत असलेल्या बहुमताचा गैरफायदा घेऊन 'लोकपाल विधेयक' त्वरित संमत घेतले. 
 
सध्याच्या भाजप सरकारच्या कामकाजा संबंधी तीन वर्ष पाळलेल्या शांततेबद्दल बोलताना अण्णा म्हणाले की, या सरकारला स्वत: ला सिद्ध करण्यासाठी काही वेळ दिला जावा असे वाटल्यामुळे मी मौन पाळले. दुर्दैवाने ते आपल्या वचनांनुसार वागू शकत नाहीत. म्हणूनच शेतकरी, युवकांना आणि असंघटित क्षेत्रातील प्रश्न आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात देशव्यापी चळवळ आखली आहे. या चळवळीत सद्यस्थितीत बदल घडवून आणण्याची इच्छा असलेली युवा शक्ती सहभागी होईल, असा विश्वास अण्णांनी व्यक्त केला. 
 
हे देशव्यापी आंदोलन दिल्लीत फेब्रुवारीमध्ये सुरू होईल. या आंदोलनापूर्वी, संपूर्ण देशातील युवकांना संघटित करण्यासाठी अण्णांचा एक देशव्यापी दौरा आयोजित केला जाणार आहे.