बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

टपाल कार्यालयामधून आधार कार्ड मिळणार

पुढील वर्षापासून महाराष्ट्र व गोव्यातील नागरिकांना राज्यांतील टपाल कार्यालयामधून (पोस्ट ऑफिस) आधार कार्ड मिळणार आहेत. या दोन्ही राज्यांमधील १२००हून अधिक पोस्ट कार्यालयांमध्ये आधार क्रमांकासाठी नोंदणी प्रक्रियाही २०१८पासून सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल एच. सी. अगरवाल यांनी दिली.

या सुविधेमुळे ज्या नागरिकांकडे अद्याप आधार कार्ड नाहीत, त्यांना पोस्टात जाऊन आधार कार्ड तयार करुन घेता येणार आहे. गोवा आणि महाराष्ट्रातील एकूण २ हजार २१६ पोस्ट कार्यालयांपैकी १ हजार २९३ कार्यालयंमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे अगरवाल यांनी सांगितले. पोस्टात आधार कार्ड काढण्याची सुविधा मिळाल्याचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील जनतेला होईल. यासाठी चार हजार कर्मचाऱ्यांना आधार कार्ड तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.