गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 (10:33 IST)

बचत खाते उघडून पोस्ट ऑफिस करणार शेतकरी वर्गास मदत राज्यातला अभिनव उपक्रम

केंद्र शासनाच्या रु.५०० व १००० च्या नोटा बंद करण्याचा ग्रामीण अर्थव्यस्थेवर व विशेषतः शेतकऱ्यांवर परीणाम झाला आहे. मात्र पोस्टाच्या खातेधारकांना त्यांच्या  बचत खात्यांवर जुन्या रु.५००/- व रु.१०००/- च्या नोटांनी अमर्याद भरणा (रु.५०,०००/- व पुढे पॅन कार्ड आवश्यक)करता येईल व रु.२४,०००/- प्रति खाते प्रति आठवडा रक्कम काढता येईल. 
 
आज गावागावात पोस्ट-ऑफीस असून बऱ्याच शेतकऱ्यांचे पोस्टात खाते आहेत. मात्र काही शेतकऱ्यांचे पोस्टात बचत खाते नाही. सदर अडचण लक्षात घेता ज्या शेतकऱ्यांचे पोस्टात बचत खाते नाही त्यांच्यासाठी टपाल विभागाच्या चांदवड उपविभागातर्फे लासलगाव व चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात बचत खाते उघडण्याची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
 
तरी, लासलगाव परीसरातील सर्व शेतकऱ्यांना सोमवार दि.२१.११.१६ रोजी सकाळी ०९:०० ते ०२:०० पर्यंत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती व चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या सहकार्याने नवीन कृषी समिती आवार लासलगाव व चांदवड येथे सोबत २ फोटो व आधार कार्ड प्रत व मतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा विज बिल प्रत किंवा शिधा-पत्रिका प्रत सोबत आणावी व विनामूल्य नवीन खाते उघडून घ्यावे असे आवाहन श्री.विशाल निकम, उपविभागीय डाक निरीक्षक,चांदवड उपविभाग यांनी केले आहे. तसेच, ज्या शेतकऱ्यांचे / नागरीकांचे यापूर्वी पोस्टात बचत खाते आहे त्यांनी पुस्तक आणून त्यात भरणा करावा.
 
मालेगाव विभागातील सर्व पोस्ट-ऑफीस हे सीबीएस ने जोडलेली असून ईतर कुठल्याही गावातील पोस्ट-ऑफीसमध्ये असलेल्या बचत खात्यात लासलगाव व चांदवड पोस्ट-ऑफिसमध्ये रु.२५,०००/- पर्यंत भरणा स्विकारला जाईल. तसेच, लासलगाव व चांदवड, निफाड, पिंपळगाव(ब.) पोस्ट-ऑफीसमधील बचत खात्यात सोयीनुसार  भरणा स्विकारला जाईल. रु.५०,०००/- पेक्षा जास्त भरणा/शिल्लक असल्यास पॅन कार्ड आवश्यक आहे.