बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

निलंबित आमदार मिश्रा यांनी गांधींजीच्या पुतळ्याला लावला मास्क

देशाची राजधानी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. त्यामुळे अनेकजण तोंडाला मास्क लावून बाहेर पडताना दिसत आहेत. पण आता काहींनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला मास्क लावला आहे. आम आदमी पक्षाचे निलंबित आमदार कपिल मिश्रा आणि भाजपचे आमदार मनजिंदर सिंग सिरसा यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला मास्क लावला आहे.

शहरातील ११ मूर्तीवरील असलेल्या मूर्तींना मास्क लावल्यामुळे या दोन्ही नेत्यांना चाणक्यपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कपिल मिश्रा आणि मनजिंदर सिंग सिरसा यांनी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यात आप सरकारला अपयश आल्याचा आरोप करत ११ मूर्ती येथे निर्दशने केले आणि गांधीजी व इतर मूर्तींना मास्क लावला.