बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 मार्च 2017 (23:22 IST)

कोल्हापुरात पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सुविधा

कोल्हापुरात पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट मिळण्याची सुविधा  सुरु झाली आहे. परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते आज या कार्यालयाचं उद्घाटन झालं.राज्यातील हे पहिलंच पासपोर्ट पोस्ट ऑफिस कार्यालय ठरलं आहे. कसबा बावड्यातील पोस्ट ऑफिसमध्ये आता पासपोर्ट मिळणार आहेत. या कार्यालयाच्या माध्यमातून जलद सेवा दिली जाईल, असं परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी सांगितलं. पासपोर्ट काढण्यासाठी www.passportindia.gov.in या वेबसाईटवरुन अर्ज करावा लागेल. याद्वारे दररोज 50 अर्ज स्वीकारले जातील. त्या अर्जांची पोस्टातच छाननी,आणि कागदपत्रे तपासून पासपोर्ट वितरित केले जातील. या पोस्ट ऑफिसमध्ये यापुढे दररोज 50 पासपोर्ट काढले जाणार आहेत.