शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 25 जून 2018 (15:26 IST)

मुलगी हवी म्हणून आईने दहा महिन्याच्या मुलाची केली हत्या

mother killed
मुलगी हवी म्हणून एका आईने स्वत:च्या दहा महिन्याच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये उघडकीस आली आहे. या आईने मुलगा झोपलेला असताना त्याला ड्रममधील पाण्यात बुडवून मारले. याप्रकरणी पोलिसांनी त्या महिलेला अटक केली आहे.
 
बिडकीन येथील पैठणखेडा गावात राहणाऱ्या सदर महिलेला तीन वर्षाचा मुलगा असून दहा महिन्यांपूर्वी तिला दुसराही मुलगा झाला होता. मात्र या महिलेला मुलगी हवी होती. मात्र मुलगाच झाल्याने ती नाराज होती. शुक्रवारी ती तिच्या माहेरी आली होती. शनिवारी रात्री सर्वजण झोपलेले असताना तिने मुलाचे अपहरण झाल्याचा कांगावा केला. त्यानंतर रविवारी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार देखील पोलिसात नोंदविली. मात्र मुलगा हरविल्यानंतरही आई इतकी निर्विकार कशी राहू शकते असा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांनी श्वानपथकाच्या सहाय्याने तपास केला असता मुलाचा मृतदेह घरातील ड्रमात आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी घरातल्या सर्वांना ताब्यात घेतले असता महिलेने तिचा गुन्हा कबूल केला.