बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 23 जून 2018 (17:03 IST)

अकरा महिन्याच्या मुलाने रिमोटचा सेल गिळला

पुण्यातील आळंदी येथे अकरा महिन्याच्या मुलाने रिमोटचा सेल गिळला आहे. हुजैफ तांबोळी असे या मुलाचे नाव आहे. शनिवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास ही घटना घडली. हुजैफला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. आता दुर्बिणीच्या साह्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करुन तो सेल बाहेर काढण्यात येणार आहे.

सकाळी हुजैफ कुटुंबियांच्या आधी जागा झाला व खेळता खेळता टेबलावर ठेवलेला रिमोट त्याने उचलला. काही वेळाने त्याने तो रिमोट जमिनीवर आपटला. त्या आवाजाने सगळे जागे झाले. हुजैफने त्यानंतर कुटुंबियांचे लक्ष नसताना जमिनीवर पडलेला सेल उचलला व पटकन गिळून टाकला.