सौंदर्यासाठी टूथपेस्ट, जाणून घ्या फायदे
टूथपेस्टचा वापर केवळ दातांसाठी नव्हे याने इतर समस्या जसे चेहर्यावरील डाग, पुरळ, सुरकुत्या यावरही केला जाऊ शकतो. खरं म्हणजे सौंदर्य वाढीसाठी टूथपेस्ट वापरले जाऊ शकतं. स्त्रियाच नव्हे तर पुरुषही आपल्या त्वचेवर याचा उपयोग करू शकतात. पिंगमेंटेशन सारखे काम करत असल्यामुळे टूथपेस्टने त्वचा उजळते. बघू याचे उपयोग:
* डार्क स्पॉट हटविण्यासाठी अर्धा चमचा टोमॅटो रसात अर्धा चमचा टूथपेस्ट मिसळा. यात 1 चमचा बेकिंग सोडा घालून फेटून घ्या. त्वचेवर लावून 15 ते 20 मिनिट राहू द्या. नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. आठवड्यातून दोनदा ही विधी अमलात आणू शकता.
* पिंपल्स दूर करण्यासाठी 2 चमचे एलोवेरा जेलमध्ये 2 चमचे टूथपेस्ट मिसळून घ्या. रात्री झोपण्यापूर्वी ही पेस्ट कापसाच्या मदतीने चेहर्यावर लावा. कोमट पाण्याने धुऊन टाका.
* दोन तोंडी केसांपासून मुक्तीसाठी एका बाऊलमध्ये केळ मॅश करून घ्या. त्यात 1 चमचा टूथपेस्ट मिसळा. ही पेस्ट दोन तोंडी केसांवर लावून अर्धा तास तसेच राहू द्या. नंतर केस धुऊन टाका. महिन्यातून एकदा हा प्रयोग करावा.
* ओठांवर चमक हवी असल्यास 1 चमचा मधात 1 चमचा टूथपेस्ट मिसळा. ही पेस्ट ओठांवर लावा. हे रोज अमलात आणू शकता.
* अनपेक्षित केस हटविण्यासाठी एका बाऊलमध्ये एम चमचा टूथपेस्ट, 2 चमचे बेसन, आणि 5 चमचे दूध मिसळून घ्या. ज्या भागाचे केस काढायचे असतील तिथे लावून 20 ते 25 मिनिट राहू द्या. नंतर कॉटन पॅड ने रब करा. आठवड्यातून दोनदा ही विधी अमलात आणू शकता.