शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

यंग दिसण्यासाठी घरगुती एलोवेरा फेस मास्क

सर्वात आधी एलोवेरा स्कीनसाठी कशा प्रकारे उपयोगी आहे हे पाहू:
त्वचेची टॅनिंग, रॅशेज, सुरकुत्या, पुरळ या सर्वांवर एलोवेरा प्रभावी आहे.
याने त्वचेला पोषण मिळतं आणि त्वचा नरम राहते.
याने त्वचा मॉइश्चराइच राहते.
एलोवेराने त्वचेवरील जखमदेखील बरी होते.
याने स्कीन टोन होते.
पुढे वाचा... कसे तयार कराल घरगुती एलोवेरा फेस मास्क

त्वचेला मॉइश्चराइज करण्यासाठी: एलोवेरा टी ट्री ऑइल मास्क
1 चमचा एलोवेरा जॅल मध्ये 7-8 थेंब टी ट्री ऑइल मिसळून हे मास्क रात्रभर चेहर्‍यावर लावून ठेवा. सकाळी चेहरा पाण्याने धुवावा.


टॅनिंग आणि सनबर्न मिटवण्यासाठी: एलोवेरा- कुकम्बर मास्क
1 लहान काकडीची प्युरी तयार करा. यात 2 चमचे एलोवेरा जॅल मिसळा. एका चमच्यात 1 एस्पिरिन टॅबलेट घोळून घ्या. ही पेस्ट इतर मिश्रणासोबत मिसळून तयार मास्क 20 मिनिटांसाठी त्वचेवर लावून ठेवा. नंतर स्वच्छ करून घ्या.


 

त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी: एलोवेरा-ओट्स-ओनियन मास्क
एका बाऊलमध्ये अर्धा कप फ्रेश एलोवेरा जॅल घेऊन त्यात अर्धा कप कांद्याचा रस आणि 1 चमचा ओट्स मिसळा. तयार स्क्रबरने स्कीनवर मसाज करा.
 
उजळ आणि चमकदार त्वचेसाठी: एलोवेरा-हनी मास्क
एका बाऊलमध्ये 1 लहान चमचा दालचिनी पावडर, 1 चमचा मध, अर्धा कप एलोवेरा जॅल मिसळून पेस्ट तयार करा. याने त्वचेवर मसाज करा. 30 मिनिटांनी पाण्याने स्वच्छ करा.

डेड स्कीनसाठी: एलोवेरा-टरमरिक मास्क
एका बाऊलमध्ये अर्धा कप एलोवेरा जॅल फेटून घ्या. त्यात 1 लहान चमचा हळद, 2 चमचे दूध, अर्धा लहान चमचा गुलाब पाणी मिसळून घ्या. यात 1 चमचा मध मिसळा. तयार मास्क त्वचेवर लावून 30 मिनिट तसेच राहू द्या.
 
तेलकट त्वचेसाठी: एलोवेरा- मुलतानी माती
अर्धा कप एलोवेरा जॅल, 1 चमचा मध आणि 2 चमचे लिंबाचा रस मिसळून घ्या. शेवटी 2 चमचे मुलतानी माती मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट त्वचेवर लावून 30 मिनिटांसाठी राहू द्या, नंतर कोमट पाण्याने धुवा.

त्वचेवरील तारुण्य टिकवण्यासाठी: एलोवेरा- मँगो मास्क
सर्वात आधी एका बाऊल अर्धा कप मँगो पल्प आणि 3 चमचे एलोवेरा जॅल मिसळून मिश्रण तयार करा. यात लिंबाचा रस मिसळा. त्वचा आणि चेहर्‍यावर या मिश्रणाने मसाज करा. 20 मिनिटांनंतर चेहरा पाण्याने धुवा.
पुरळ हटवण्यासाठी: एलोवेरा- शी बटर मास्क
एका बाऊलमध्ये 3 चमचे एलोवेरा जॅल, 3 चमचे शी बटर मिसळा. या मिश्रणात ऑलिव्ह मिसळा. आता हे मिश्रण 20 मिनिटासाठी चेहर्‍यावर लावून ठेवा. नंतर पाण्याने स्वच्छ धुवा.