या 10 चुकांमुळे तुम्ही दिसता वयस्कर
मेकअपने सुंदरता तर वाढतेच याबरोबरच आत्मविश्वास ही झळकतो यात शंका नाही. मेकअपच्या मदतीने आपला सुंदर दिसू शकता पण लहान-सहान चुकांमुळे आपण सुंदर दिसण्याऐवजी वयस्कर दिसू लागता. जाणून घ्या त्या 10 चुका ज्यामुळे आपले वय अधिक दिसतं:
कंसीलरचा अती वापर- छान दिसण्याच्या ओढीत कित्येकदा कंसीलरचा अती वापर करण्यात येतं. विशेषत: जेव्हा आपण चुकीचा रंग निवडता आणि त्याची गाढी परत त्वचेवर लावता तर सुरकुत्या दिसायला लागतात.
मस्कारा- मस्कारा पापण्या काळ्या आणि आकर्षक दिसण्यासाठी केला जातो. पण याचा अती वापर विशेषत: खालील पापण्यांवर मस्काराचा अती वापर डोळ्याखाली सुरकुत्यांकडे आकर्षित करतं.
लिपस्टिकचा चुकीचा शेड- लिपस्टिकचा जादू वेगळाच आहे. याविना मेकअप पूर्ण होणे शक्य नाही. जर आपले ओठ पातळ, लहान आहे तर डार्क कलर टाळा. डार्क कलर लावल्यावर आपण वयस्कर दिसाल.
आयशेडो- पूर्ण आयलिडवर आयशेडो अप्लाय करू नका. यामुळे वय अधिक दिसतं. आयशेडो फक्त डोळ्यांच्या बाह्य कोपर्यांवर लावा.
आय लायनर- डोळ्यांच्या खालील लीडवर लायनररच्या अती वापरामुळे डोळे लहान दिसतात. आपल्या लाइट मेकअप पेन्सिल वापरायला हवी. याने पर्फेक्ट लुक येईल.
ब्लश ऑन- आता वेळ आली आहे की आपण डार्क आणि इंटेंस कलर्स टाळावे. डार्क कलरमुळे वय अधिक दिसून येतं. गालांच्या वरती आणि मधील भागावर ब्लशर अप्लाय करू नका. केवळ उभारलेल्या भागाला हायलाइट करणे उत्तम राहील. हे अप्लाय करताना नाकाच्या अगदी जवळून हे अप्लाय करू नका.
आयब्रो- आयब्रो लांब आणि जाड दिसावी म्हणून डार्क पेन्सिल वापरणे चुकीचे ठरेल. नेचरल कलर पेन्सिल वापरा, कृत्रिम दिसता कामा नये.
डार्क सर्कल्स- डोळ्यांखाली डार्क सर्कल्स मेकअप केल्यानंतरही पिच्छा सोडत नाही. या भागात अतिरिक्त पण हलकी लेयर कंसीलरची वापरू शकता.
लिप लायनर- ओठांना पर्फेक्ट लुक देण्यासाठी लिप लायनर आवश्यक आहे, पण चुकीचा शेड आणि जाड डार्क लायनिंगमुळे आपण वयस्कर दिसू शकता. लाइट शेड आणि पातळ लाइनद्वारे आपण सौम्य आणि सुंदर लुक देऊ शकता.
पावडर- पूर्ण मेकअप झाल्यावर पावडर अप्लाय करणे आवश्यक आहे पण अगदी कमी मात्रेत. अती पावडर थोपल्याने सुरकुत्या उभारून दिसतात. त्वचा कोरडी पडते. आणि पॅचेस दिसू लागतात. याने पूर्ण ग्लो नाहीसा होतो. म्हणून पावडर अप्लाय करा पण सीमित मात्रेत.