बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : शुक्रवार, 9 जून 2023 (20:19 IST)

Tips of Mansoon खास मान्सूनसाठी फॅशन टिप्स

beauty tips in rainy season
मान्सून आता देशभरात चांगला स्थिरावतो आहे. पावसाळ्यातही आपला फॅशनेबल लूक काय राहिला पाहिजे अशी इच्छा असणार्‌यांसाठी येथे खास काही टिप्स दिल्या गेल्या आहेत. यामुळे आपण पावसाळी हवेतही तजेलदार, फ्रेश व उठून दिसू शकता. उन्हाळ्यासाठी वापरले जाणारे कपडे, चपला, टोप्या पावसाळ्यासाठी उपयुक्त नसतात तीच बाब मेकअपचीही असते. मग मान्सूनसाठी कपडे, मेकअपची निवड कशी करावी याची ही उपयुक्त माहिती.
 
पावसाळ्यात मात्र कपडा निवडताना पॉली नायलॉन, रेयॉन, नायलॉन यांना प्राधान्य द्यावे. सुती डेनिम, रंग जाणारे कापड टाळावे. मऊ सुती व पॉली फ्रॅबिक्स या सीझनसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. क्रेप, शिफॉन असले कपडे पावसाळ्यासाठी उपयुक्त नाहीत हेही लक्षात ठेवावे.
 
कपड्यांसोबतच्या अ‍ॅक्सेसरीतील महत्त्वाची असते ती पर्स. या दिवसांत वॉटरप्रूफ बॅग्ज हव्यात. त्यामुळे आपले फोन, मेकअपचे सामान, पुस्तके, वॉलेट ओली होणार नाहीत. चपला शक्यतो पावसाळ्यासाठी खास असाव्यातच पण रंगीबेरांगी छत्री अथवा कलरफूल रेन जॅकेटस आपल्या स्टाईलला अनोखा लूक देऊ शकतात हे लक्षात ठेवावे. अर्थात त्याची निवड करताना आपली शरीरयष्टी, उंची लक्षात घेऊन करावी.
आयलायनर, फाउंडेशनचा वापर शक्यतो नको. त्याऐवजी वॉटरप्रूफ न्यूड मेकअप ट्राय करावा. त्याची सुरवात प्रायमरपासून होते. प्रायमरची शेड आपल्या रंगानुसार निवडावी. म्हणजे रंगगोरा असेल तर पीच शेड तुम्हाला जास्त तजेलदार बनवेल व चेहरा ताजातवाना दिसेल. गहू वर्णाच्या त्वचेसाठी गुलाबी रंग शोभेल. या दिवसांत जास्त डार्क शेडचा वापर टाळलेलाच बरा. ओठांसाठी ग्लॉसी लिपस्टिक व आब्रो पेन्सिलऐवजी आयब्रो जेलचा वापर करावा.