बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

Vastu Tips : घरातील वास्तुदोष दूर करतो लिंबू

vastu lemon
लिंबू जेथे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तसेच ज्योतिषशास्त्रात देखील लिंबाचा वापर दृष्ट (नजर) काढण्यास केला जातो. तसेच लिंबू वास्तुदोष दूर करण्याचे काम देखील करतो. असे म्हटले जाते की लिंबाचे झाड घरातील नकारात्मक शक्तींना घराबाहेर काढण्यास मदत करतो. ज्याने वास्तुदोषाचा प्रभाव कमी होऊन घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो.  
 
जर तुमच्या घरात एखादा सदस्य अचानकच आजारी पडतो आणि कुठलेही औषध त्याच्यावर लागू पडत नसेल तर एका लिंबावर काळ्या शाहीने 307 लिहून त्या व्यक्तीवर विपरीत दिशेने सातवेळा फिरवा आणि झाडावर टाकून द्या. असे केल्याने त्याच्या आरोग्यात सुधारणा होईल.  
 
तसेच तुम्ही रात्री जर भितीदायक स्वप्नांमुळे झोपू शकत नसाल तर आपल्याजवळ एक हिरवा लिंबू ठेवून झोपा आणि तो लिंबू वाळल्यानंतर त्याच्या जागेवर दुसरे लिंबू ठेवा. ही क्रिया पाच वेळा करा. असे केल्याने तुमची सर्व समस्या दूर होईल. आणि तुम्हाला गाढ झोप लागेल.