1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Updated : सोमवार, 3 मार्च 2025 (08:25 IST)

Flying Hanuman हवेत उडणार्‍या हनुमानाचे चित्र लावण्याने काय होतं, जाणून घ्या

Flying Hanuman
घरात असे चित्र लावणे शुभ मानले जाते ज्यात हनुमान हवेत उडताना प्रदर्शित केलेले असतील. पर्वत घेऊन उडताना हनुमानाचे चित्र लावल्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये कधीही विश्वास आणि शौर्याची कमतरता भासणार नाही. आपण प्रत्येक परिस्थितीला सहज सामोरा जाल. 
 
उडणार्‍या हनुमानाचे चित्र लावल्याने आपली प्रगती होईल आणि जीवनात यश गाठाल.
 
वास्तुच्या नियमांनुसार घरात हनुमानाची मूर्ती किंवा चित्रामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते. वास्तु शास्त्रानुसार हनुमानाचे चित्र नेहमी दक्षिण दिशेकडे लावावे.
 
हनुमानाचे चित्र लावण्यासाठी दक्षिण दिशा सर्वात शुभ असल्याचे मानले जाते कारण हनुमानाने आपल्या शक्तीचा सर्वात अधिक प्रभाव या दिशेत दाखवला आहे.