धनत्रयोदशीला भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मीसाठी बनवा या रेसिपी
धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मी यांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी खास आणि पारंपरिक मिठाई बनवली जाते. खाली काही खास आणि सोप्या धनत्रयोदशी विशेष पाककृती दिल्या आहे. या तुमच्या पूजेला अधिक शुभ बनवतील.
गुलाब जामुन
साहित्य-
१००- ग्रॅम मावा
एक टेबल स्पून- मैदा किंवा रवा,
१/४ टी स्पून- बेकिंग सोडा
दोन कप- साखर
दोन कप- पाणी
दोन टेबल स्पून- मिल्क
वेलची पूड
कृती-
सर्वात आधी एका बाउलमध्ये खवा मॅश करुन घ्या. यात मैदा आणि बेकिंग सोडा मिसळून गोळा तयार करा. आता मिश्रण नरम आणि लवचिक असलं पाहिजे. याचे लहान-लहान बॉल्स तयार करा. कढईत तूप घालून तापवून घ्या. आच कमी करुन यात गोळे घालून सतत हलक्या हाताने ढवळत तळून घ्या.
तळताना हे एकमेकाला चिटकू नये याची काळजी घ्या. या प्रकारे सर्व गोळे तळून घ्या. पाक तयार करण्यासाठी पाण्यात साखर घालून मंद आचेवर शिजू द्या. सतत ढवळत राहा.
घट्ट होयपर्यंत शिजवा. आता यात वेलची पूड घाला. नंतर जरा गार झाल्यावर यात गुलाब जामुन घाला.
बेसन लाडू
साहित्य-
बेसन- २ कप
तूप - १ कप
पिठीसाखर - १ कप
वेलची पावडर - १/२ चमचा
काजू, बदाम
मनुका
कृती-
सर्वात आधी एका जाड बुडाच्या कढईत तूप गरम करा. त्यात बेसन घालून मंद आचेवर सतत ढवळत भाजा. बेसनाचा रंग हलका तपकिरी होईपर्यंत आणि सुगंध येईपर्यंत भाजा. बेसन भाजल्यानंतर कढई गॅसवरून खाली उतरवा आणि त्यात पिठीसाखर मिसळा. नीट ढवळा. चिरलेले काजू, बदाम आणि मनुका घाला. वेलची पावडर मिसळा. मिश्रण थंड झाल्यावर हाताने छोटे-छोटे लाडू वळा. जर मिश्रण कोरडे वाटले तर थोडे तूप घालून मळा.
बेसन बर्फी
साहित्य-
बेसन- २ कप
तूप- १ वाटी
साखर- १ कप
पाणी- १/२ कप
वेलची पूड- १/२ टीस्पून
पिस्ता
बदाम
कृती-
बेसनची बर्फी बनवण्याकरिता एका कढईमध्ये तूप गरम करावे. तसेच तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये बेसन घालावे. व भाजून घ्यावे. बेसन मधून तूप निघू लागल्यास समजावे बेसन भाजले गेले. तसेच हे भाजलेले बेसन थंड करण्यासाठी ठेवावे. तसेच दुसऱ्या कढईमध्ये साखर आणि पाणी घालावे. व साखरेचा पाक तयार करून घ्यावा.आता भाजलेल्या बेसनात साखरेचा पाक घालून चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्यावे. यामध्ये वेलची पूड देखील घालावी. आता हे मिश्रण लहान गॅस वर शिजवून घ्यावे. आता का ताटलीला तूप लावून घ्यावे. व हे मिश्रण ताटलीमध्ये काढावे. वरून पिस्ता किंवा बदाम ने सजवावे. व हे मिश्रण थंड होऊ द्यावे. त्यानंतर तुम्हाला आवडेल त्या आकारात बर्फी कापून घ्यावी. तुमच्या आवडीप्रमाणे बर्फीवर चांदीचा वर्क देखील लावू शकतात. तर चला तयार आहे आपली दिवाळी विशेष बेसनची बर्फी.
रव्याचा शिरा
साहित्य-
रवा - १ कप
तूप - १/२ कप
साखर - ३/४ कप
दूध - १ कप
केशर - दुधात भिजवलेले
वेलची पावडर
काजू, बदाम, पिस्ता
मनुका
कृती-
सर्वात आधी कढईत तूप गरम करा आणि त्यात रवा घालून मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजा.
एका भांड्यात दूध आणि पाणी एकत्र गरम करा. रवा भाजला गेल्यावर हळूहळू हे गरम मिश्रण कढईत घाला आणि ढवळत राहा जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. रवा शिजल्यानंतर साखर आणि भिजवलेले केशर घाला. साखर वितळेपर्यंत ढवळा. तुपात परतलेले काजू, बदाम, पिस्ता आणि मनुका घाला. वेलची पावडर मिसळा. शीरा तयार झाल्यावर थंड करून स्वच्छ ताटात ठेवा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik