Dhanteras 2025 धनत्रयोदशी हा सण १८ ऑक्टोबर रोजी येत असून या दिवशी धन्वंतरी आणि कुबेर यांची पूजा केली जाते.
धनत्रयोदशीची शुभ मुहूर्त
१८ ऑक्टोबर २०२५
त्रयोदशी तिथी रोजी दुपारी १२:१८ वाजता सुरू होईल.
त्रयोदशी तिथी १९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १:५१ वाजता संपेल.
धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त
संध्याकाळी ७:१५ ते ८:१९.
प्रदोष काल : संध्याकाळी ५:४८ ते रात्री ८:१९.
यम दीपम वेळ: प्रदोष काल दरम्यान.
धनत्रयोदशीच्या खरेदीसाठी शुभ मुहूर्त
अभिजित मुहूर्त: सकाळी ११:४३ ते दुपारी १२:२९.
लाभ चोघडिया: दुपारी १:३२ ते दुपारी २:५७ पर्यंत.
अमृत चोघडिया: दुपारी २:५७ ते दुपारी ४:२३ पर्यंत.
लाभ चौघडिया: संध्याकाळी ५:४८ ते ७:२३.
धनत्रयोदशी शुभ योग
ब्रह्मा - १८ ऑक्टोबर, सकाळी १:४८ - १९ ऑक्टोबर, सकाळी १:४७
इंद्र - १९ ऑक्टोबर, सकाळी १:४७ - २० ऑक्टोबर, सकाळी २:०४
धनत्रयोदशी शुभ योग
धनतेरस पूजा करण्यासाठी, प्रथम घर स्वच्छ करा आणि पूजा स्थळी लक्ष्मी, धन्वंतरी आणि गणपती यांच्या मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा. त्यानंतर, पूजा करण्यासाठी दिवे लावा, फुले, तांदूळ आणि धूप अर्पण करा आणि मंत्रांचा जप करा. शेवटी, लक्ष्मी आणि धन्वंतरीची आरती करा.
धनत्रयोदशी पूजा पद्धत
सुरुवातीला घराची स्वच्छता करा. अंगणात आणि देवासमोर रांगोळी काढा.
पूजा स्थळी एक चौरंग मांडून त्यावर स्वच्छ लाल किंवा पिवळा रंगाचा कापड पसरा.
एक तांब्याचे किंवा मातीचे भांडे घ्या, त्यात गंगाजल किंवा स्वच्छ पाणी भरा, त्यात आंब्याची पाने घाला आणि त्यावर एक नारळ ठेवा.
चौरंगावर श्री गणपती, लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांच्या मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करा.
पूजेच्या ठिकाणी हळद-कुंकु, अक्षता, फुले, आणि धूप अर्पण करा.
पूजेदरम्यान, गायीच्या तुपाचा एक मोठा दिवा आणि १३ लहान दिवे लावा.
प्रथम गणपतीची पूजा करा आणि त्यानंतर भगवान धन्वंतरीची पूजा करा.
धनत्रयोदशीच्या दिवशी काही नवीन वस्तू खरेदी केल्या जातात, जसे की सोने, चांदी किंवा भांडी, जे समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
गोडाचा नैवेद्य दाखवा.
देवासमोर नवीन खरेदी केलेली वस्तू ठेवून त्याची पूजा करा.
लक्ष्मी आणि धन्वंतरीची प्रार्थना करा.
संध्याकाळी घराच्या प्रवेशद्वारावर किंवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला यमराजासाठी एक दिवा प्रज्वलित करा. याला 'यमदीपदान' म्हणतात.
पूजा झाल्यावर लक्ष्मी आणि धन्वंतरीची आरती करा.
धन्वंतरीची आरती
कमलनयन शामवर्ण, पीतांबर साजे
मनमोहन वस्त्राने, आदिदेव विलसे
शंखचक्र जलौका, अमृतघट हाती
चर्तुभुजजांनी अवघ्या, दुखाला पल्लवी
जय देव, जय देव, धनवंतरी देवा
सकलजनांना धावा आरोग्य देवा
जय देव, जय देव, धनवंतरी देवा
नमामि धनवंतरी, नमामि धनवंतरी
देवांयानी दैत्यानी, मंथन ते केले
त्यातुन अमृतकलशा, घनेऊनिया आले
भय दुख सरण्या, जरा मृत्यु हरण्या
सकलांना त्याचे, संजीवीनी झाले
जय देव, जय देव, धनवंतरी देवा
सकलजनांना धावा, आरोग्य देवा
जय देव, जय देव, धनवंतरी देवा
नमामि धनंवतरी, नमामि धनवंतरी
शास्त्रांचे परिशीलन, अनुभव कर्मांचा
बुध्दीने तर्काने, तत्पर ती सेवा
शुचिदर्श सत्यधर्म, संयत उदारता
श्रीकांतासह सालया, आशिर्वच धावा
जय देव, जय देव, धनवंतरी देवा
सकलजनांना धावा, आरोग्य देवा
जय देव, जय देव, धनवंतरी देवा।।