अकबर-बिरबलची कहाणी : तू तर कमालच केलीस!
Kids story : बादशहाच्या दरबारात जाण्याचा बिरबलाचा पहिलाच दिवस होता. आता दरबाराचे थोडे-फार काम झाल्यावर बादशाहाने बिरबलाला विचारले, '' बिरबल, तुमच्या हिंदू लोकांची दिवाळी जितक्या आनंदाने येते, तितक्याच आनंदाने ती निघून जाते का?'' या वर बिरबल म्हणाला....
बिरबल : होय महाराज.
बादशाहा : कशावरून म्हणतोस ?
बिरबल : आणि म्हणून तर ती पुढील वर्षी न चुकता अगदी वेळेवर येते ना ? जर ती आनंदाने गेली नसती, तर ती पुन्हा परत आली असती का?
बादशाहा : वा रे वाह ! बिरबल, तू तर कमालच केलीस.
Edited By- Dhanashri Naik