शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Updated : बुधवार, 24 मे 2023 (20:35 IST)

वास्तू शास्त्रानुसार घरात या ठिकाणी पाणी ठेवू नये

vastu elements in kitchen
वास्तू शास्त्रानुसार आग्नेय दिशाचे आराध्य अग्निदेव आहे. या दिशेचा ताबा शुक्र ग्रहाकडे असतो. या दिशेत पूर्व आणि दक्षिणचा समावेश असतो. या दिशेला सूर्याची किरणे जास्त पडतात. म्हणून ही दिशा इतर दिशांपेक्षा सर्वाधिक उष्ण असते. 
 
वास्तू शास्त्रानुसार ही दिशा अग्नीशी निगडित कार्यांसाठी मानली जाते. आग्नेय दिशेमध्ये स्वयंपाकघर, विजेचे उपकरणे, इन्व्हर्टर, गरम पाण्याची भट्टी आणि बॉयलर ठेवणं उत्तम असतं. 
 
शुक्राची अधिपती असल्यामुळे ही दिशा महिलांच्या आरोग्यावर देखील परिणाम करते. या दिशेने ड्रेसिंग रूम आणि सौंदर्यप्रसाधन कक्ष बनविणे देखील शुभ असतं. 
 
बार बनविण्यासाठी देखील आग्नेय कोण शुभ असतं. ही दिशा स्वयंपाकघरासाठी अधिक योग्य असते. कारण आग्नेय कोणात अग्नीशी निगडित वस्तू ठेवणं लाभदायी असतं.
 
परंतू आग्नेय कोपर्‍यात कधीही पाणी ठेवू नये. बोरिंग, नळ, हातपंप आणि पाण्याची टाकी देखील ठेवणं योग्य नाही. असे केल्यास कुटुंब प्रमुख कर्जबाजारी होतो. 
 
जर या दिशेला स्वयंपाकघर आहे तरी पण स्वयंपाकघराला एक भाग समजून त्यामध्ये देखील गॅस स्टोव्ह, ओव्हन, खाद्य पदार्थ साठवून ठेवण्यासाठी कपाट किंवा सिंक आणि रेफ्रिजरेटर ठेवण्याची व्यवस्था वास्तुनुसार करायला पाहिजे. 
 
स्वयंपाकघरात उत्तर-पूर्वेकडे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करू शकता किंवा आरओ लावू शकतो.