शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

मान्सून: पर्समध्ये असू द्या या वस्तू

प्रत्येक सीझनप्रमाणे पावसाळ्यातही सौंदर्याची काळजी घेण्याची फार गरज असते. म्हणून अश्या काही वस्तू आहे ज्या मान्सून सीझनमध्ये आपल्या पर्समध्ये असू द्यावा:
क्लीन्जर
या सीझनमध्ये चेहर्‍यावर धूळ तर जमते वरून बॅक्टिरीअल इन्फेक्शन होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. म्हणून या दिवस क्लीन्जरने चेहरा स्वच्छ करून त्वचा ताजीतवानी राहू शकते.
 
बी बी क्रीम
फाउंडेशनऐवजी बी बी क्रीम वापरा. हे वॉटरप्रूफ, स्वेट प्रूफ असतं आणि यात एसपीएफ आढळतं ज्याने यूव्ही किरणांपासून त्वचेची रक्षा होते.
 
टोनर
याने त्वचेवर नैसर्गिक चमक टिकून राहते. टोनर वापरल्याने फ्रेश वाटेल.
 
लिप बाम
फाटलेले, ड्राय ओठांपासून मुक्तीसाठी लिप बाम वापरावा. मान्सून सीझनमध्ये एसपीएफ आढळणारं ‍बाम वापरावा.
 

वाइप्स
चेहर्‍यावर नमी वाटल्यास किंवा चेहरा तेलकट जाणवतं असल्यास वाइप्स वापरावे. याने लगेच फ्रेश वाटू लागतं.
 
कंगवा
या सीझनमध्ये कधी ही ओल्या केसांच्या समस्येला तोंड द्यावे लागू शकतं. म्हणून कंगवा जवळ असू द्यावा.
क्रीम
त्वचा ड्राय वाटत असल्या क्रीम लावणे गरजेचं असतं. मान्सून मध्ये नैसर्गिक क्रीम वापरावी.
 
परफ्यूम
पावसाळ्यात ओल्या कपड्यांमधून येणारा दुर्गंध नकोसा वाटतो. म्हणून परफ्यूम वापरवा.