रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 2 ऑगस्ट 2018 (09:14 IST)

राज्यात १६ बनावट व बोगस अभियांत्रिकी महाविद्यालये

देशात एकूण २७७ बनावट व बोगस अभियांत्रिकी महाविद्यालये असून त्यांतील ६६ दिल्लीत आहेत, अशी माहिती मनुष्यबळ विकासमंत्री सत्यपाल सिंह यांनी लोकसभेत दिली. यामध्ये तेलंगण, पश्चिम बंगाल या राज्यांत अनुक्रमे ३५ व २७ बनावट अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण मंडळ म्हणजे एआयसीटीईच्या मान्यतेशिवाय या संस्था चालवल्या जात असून त्या बेकायदेशीर व बनावट आहेत.
 
कर्नाटक २३, उत्तर प्रदेश २२, हरयाणा १८, महाराष्ट्र १६ व तमिळनाडू ११, दिल्ली ६६,  हिमाचल प्रदेश १८, बिहार १७, गुजरात ८, आंध्र ७, चंडीगड ७, पंजाब ५, राजस्थान ३, उत्तराखंड ३ याप्रमाणे बनावट अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या आहे. लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात सिंह यांनी म्हटले आहे की, या संस्थांना एक तर एआयसीटीईची परवानगी घ्यावी किंवा महाविद्यालये बंद करावीत असे दोनच पर्याय देण्यात आले आहेत. बनावट शिक्षण संस्थांविरोधात कारवाई करण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने याप्रकरणी दिले असून आयोगाच्या संकेतस्थळावर २४ बोगस विद्यापीठांची यादी आहे.