शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

मरण्यापूर्वी डोक्याशी असतील या चार वस्तू तर यातनांपासून मुक्ती मिळेल

गरूड पुराणानुसार मरताना आपल्याजवळ या 4 वस्तू असल्यास यमराज देखील आपल्याला प्रणाम करतात आणि यातना देत नाही. तसेतर मेल्यानंतर काय घडतं हे रहस्यच आहे परंतू शास्त्रांप्रमाणे जीवनात चांगले-वाईट कर्मांचे फल भोगणे तर भागच आहे. तरीही मरताना आपल्याजवळ काही खास वस्तू असल्या तर यातनांपासून मुक्ती मिळू शकते. जाणून घ्या काय आहे त्या वस्तू: 
 
तुळस
तुळशीचं झाडं डोक्याशी असल्यास मनुष्याची आत्मा शरीर त्याग केल्यानंतर यमदंडापासून वाचते. मरत असलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर तुळशीचे पान ठेवल्याने लाभ होतो.
 
गंगाजल
मृत्यू दरम्यान मुखात गंगाजल पाजण्याची प्रथा असते. गंगाजल शरीराला पवित्र करतं आणि मरत असलेल्या व्यक्तीच्या मुखात गंगाजल टाकल्याने यमलोकात त्याला दंड भोगावे लागत नाही असे म्हणतात. या कारणामुळेच जीवनाच्या शेवटल्या क्षणांमध्ये गंगाजलसह तुळस दिली जाते.
 
श्री भागवत
मृत्यूचा जवळ असल्यास श्री भागवत किंवा इतर धर्मग्रंथाचा पाठ केल्याने व्यक्ती सर्व प्रकाराच्या सांसारिक मोह-मायेतून मुक्त होतो. या प्रकारे आत्म्याने शरीर त्याग केल्यावर मुक्ती मिळते आणि यातना सहन न करता स्वर्गाची प्राप्ती होते. केवळ डोक्याशी ग्रंथ ठेवलं असलं तरी मुक्ती मिळते.
 
सकारात्मक विचार
शास्त्रांप्रमाणे मृत्यू निकट असलेल्या व्यक्तीच्या जवळपास वावरणार्‍या लोकांचे विचार उच्च असावे. मरताना कोणत्याही प्रकाराचा क्रोध, ताण नसावा. मरताना केवळ प्रार्थना आणि आशीर्वाद असावा.