बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018 (00:18 IST)

शिवपुराण: पाहुण्यांना भोजन करवताना लक्षात ठेवण्यासारखा ह्या 4 गोष्टी

धर्मग्रंथात पाहुण्यांच्या महत्त्वाबद्दल बरेच काही सांगण्यात आले आहे. घरी आलेले पाहुणे देवासारखे असतात. हिंदू धर्मात देव पूजेत किंवा बर्‍याच सणांमध्ये पाहुण्यांना भोजन करवण्याचे महत्त्व आहे. अतिथी सत्काराबद्दल शिवपुराणात अशा 4 गोष्टी सांगण्यात आल्या आहे, ज्यांचे पालन केले तर मनुष्याला अतिथिला भोजन करवण्याचे फळ नक्कीच मिळतात.  
 
1. मन साफ असायला पाहिजे  
असे म्हटले जाते की ज्या मनुष्याचे मन शुद्ध नसत, त्याला कधीही त्याच्या शुभ कार्यांचे फळ मिळत नाही. घरी आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करताना किंवा त्यांना भोजन करवताना कुठले ही चुकीचे भाव मनात ठेवू नये. अतिथी सत्कारच्या वेळेस जेव्हा मनुष्यच्या मानत जळण, क्रोध, हिंसा सारख्या गोष्टी चालत राहतात, त्याला कधीपण त्याच्या कर्मांचे फळ मिळत आही. म्हणून या गोष्टींकडे लक्ष्य देणे फार गरजेचे आहे.    
 
2. तुमची वाणी मधुर असायला पाहिजे 
मनुष्याला कधीही घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान नाही करायला पाहिजे. बर्‍याच वेळेस मनुष्य रागाच्या भरात किंवा इतर कोणत्या कारणाने घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान करून देतो. असे केल्याने मनुष्य पापाचा भागीदार बनतो. प्रत्येक मनुष्याला आपल्या घरी आलेल्या पाहुण्या चांगले भोजन करवून त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने बोलायला पाहिजे व त्यांचे स्वागत-सत्कार केले पाहिजे.  
 
3. शरीर शुद्ध असायला पाहिजे  
पाहुण्यांना देवासारखे मानण्यात आले आहे. अपवित्र शरीराने न तर देवाची पूजा केली जाते न ही पाहुण्यांची. कोणालाही भोजन करवण्याअगोदर आधी मनुष्याने अंघोळ करून, स्वच्छ कपडे धारण करायला पाहिजे. अपवित्र भावाने केलेल्या सेवेचे कधीही फळ मिळत नाही.  
 
4. भेटवस्तू जरूर द्या   
घरी आलेल्या पाहुण्यांना भोजन करवल्यानंतर काही काही भेटवस्तू जरूर द्या. आपल्या श्रद्धेनुसार पाहुण्यांना नक्कीच भेटवस्तू दिल्या पाहिजे चांगल्या भावनांनी दिलेल्या भेटवस्तू नेहमी शुभ फळ देणारा असतो.