शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

मंगळवारी हे 5 उपाय करा आणि मारुतीची कृपा मिळवा

मंगळवारी मारुती आणि मंगळ ग्रहाच्या निमित्ताने विशेष पूजा केली जाते. अशी मान्यता आहे की मंगळ ग्रहाच्या पूजेमुळे जमिनीशी निगडित कार्यांमध्ये विशेष लाभ मिळू शकतो. तसेच हनुमानाच्या कृपेमुळे सर्व प्रकाराचे कष्ट आणि त्रासांपासून मुक्ती मिळते. येथे आम्ही तुम्हाला असे 5 उपाय सांगत आहो, जे केल्याने हनुमंताची कृपा तुमच्यावर जन्मभर राहील.  
 
1. प्रत्येक मंगळवारी मारुतीला शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पित करायला पाहिजे. या उपायाने मारुती लवकर प्रसन्न होतो.  
2. लाल मसुरीच्या डाळीचे दान एखाद्या गरजूला व्यक्तीला द्या. या उपायामुळे मंगळाचे सर्व दोष दूर होण्यास मदत मिळते.
3. शिवलिंगावर लाल फूल अर्पित करायला पाहिजे. शिवलिंगावर लाल फूल अर्पित केल्याने मंगळ ग्रहाची प्रसन्नता वाढते.
4. मारुतीच्या समोर दिवा लावावा आणि हनुमान चालीसाचा पाठ करावा.
5. एखाद्या असा तलाव किंवा सरोवर जेथे मासोळ्या आहे. तेथे जाऊन मासोळ्यांना कणकेच्या गोळ्या बनवून खाऊ घालाव्या. हा उपाय तुम्ही रोज करू शकता.