बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

राहू काळात हे टाळावे

काय आहे राहू काळ:
 
सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या काळामधील आठव्या भागाचा स्वामी राहू असतो. याला राहू काळ असे म्हणतात. प्रत्येक दिवशी ९० मिनिटांचा निश्चित राहू काळ असतो. राहू काळाची वेळ एखाद्या स्थळाच्या सूर्योदय व वार यावर अवलंबून असते.
 
राहू काळात हे करणे टाळावे:
या काळात यज्ञ करू नये.
नवीन व्यवसाय सुरू करू नये.
महत्त्वाची यात्रा करणे टाळावे.
यात्रेची योजना आखत असाल तरी या काळात यात्रा सुरू करू नये.
या काळात खरेदी-विक्री करणे टाळावे कारण याने हानी होऊ शकते.
राहू काळात विवाह, साखरपुडा, धार्मिक कार्य किंवा गृह प्रवेश सारखे मांगलिक कार्य करू नये.
या काळात सुरू केलेले कोणत्याही कार्य अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून कार्य करू नये.
राहू काळादरम्यान अग्नी, यात्रा, क्रय- विक्रय, लेखी किंवा बहीखाणे संबंधित कार्य करू नये. 
या काळात वाहन, प्रॉप्रर्टी, मोबाइल, कॉम्प्यूटर, टीव्ही, दागिने किंवा इतर मूल्यवान वस्तू खरेदी करू नये.
 
मान्यता:
राहू काळात सुरू केलेल्या कामात यश मिळविण्यासाठी अत्यंत तप करावं लागतं कारण अडथळे निर्माण होत असतात असे मानले गेले आहे. कित्येकदा कार्य अर्पूण राहतात. अनेक लोकांप्रमाणे या दरम्यान केलेले कार्य विपरित व अनिष्ट फळ प्रदान करतात.
 
उपाय : 
तरी राहू काळात काम करावेच लागले तर पान, दही किंवा काही गोड पदार्थ खाऊन घरातून बाहेर पडावे. घरातून निघताना आधी 10 पावलं उलट चालावे नंतर यात्रेवर निघावे. तसेच काही मंगल कार्य करायचं असल्यास हनुमान चालीसा वाचून पंचामृताचे सेवन करावे नंतर कोणतेही कार्य करावे.