रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 जानेवारी 2019 (00:42 IST)

एकाच चित्रपटातून रोहित शेट्टीने केली 4 चित्रपटांची घोषणा

28 डिसेंबरला रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिम्बा' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची मने जिंकली. विशेष म्हणजे या चित्रपटातून रोहित शेट्टीने आपल्या आगामी 4 चित्रपटांचीही घोषणा केली आहे. 'सिम्बा'मधून 'सूर्यवंशी', 'सिंघम 3', 'गोलमाल 5' आणि 'सिम्बा 2' या चित्रपटांची घोषणा करण्यात आली. यातील अक्षयकुमारची मुख्य भूमिका असलेल्या सूर्यवंशी चित्रपटाच्या चित्रीकरणाला 2019 मध्ये सुरुवात होणार आहे. ही पहिलीच वेळ असेल की, एखाद्या दिग्दर्शकाने आपल्या आगामी चित्रपटांची अशा प्रकारे घोषणा केली असेल. सध्या प्रेक्षकांच्या सकारात्क प्रतिक्रिया सिम्बाला मिळताना दिसत असल्यामुळे, हा चित्रपट देखील 100 कोटींचा गल्ला पार करेल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. असे झाल्यास 100 कोटींचा गल्ला पार करणारा 'सिम्बा' हा रोहित शेट्टीचा आठवा चित्रपट ठरेल.