शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 डिसेंबर 2018 (11:26 IST)

इरफानच्या सुपरहिट चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये शाहरुख-काजोलची जोडी पुन्हा एकदा दिसू शकते

शाहरुख खान आणि काजोलची जोडी पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळू शकते. लोक अजूनही या जोडीला सिल्वर स्क्रीनवर सोबत पाहू इच्छित आहे आणि त्यांची ही इच्छा लवकरच पुन्हा एकदा पूर्ण होऊ शकते. बातमी आहे की 'हिंदी मीडियम' या चित्रपटाचा सीक्वेल तयार होणार आहे, त्यात काजोल आणि शाहरुख यांचे नाव प्रमुख कलाकार म्हणून सामोर आहे. असे ऐकण्यात आले आहे की त्या दोघांनीही या चित्रपटाची स्क्रिप्ट देखील वाचून घेतली आहे. सूत्रांनी असेही म्हटले आहे की इरफान खानदेखील चित्रपटात दिसतील. यावेळी या चित्रपटाची शूटिंग यूएसमध्ये केली जाईल. खरं तर, इरफान खानच्या खराब आरोग्यामुळे चित्रपट निर्माते दिनेश विजान नवीन स्टारकास्टसह 'हिंदी मीडियम'च्या सीक्वेलची तयारी करत होते पण चित्रपट काही काळासाठी थांबून गेला आहे.
 
आता पुन्हा एकदा सिनेमाबद्दल चर्चा सुरू झाली आहे, पण 'हिंदी मीडियम' सीक्वेल संबंधित सर्व अहवालांबद्दल आतापर्यंत दिनेश विजानने कोणताही प्रतिसाद दिला नाही आहे. चित्रपट 'हिंदी मीडियम'मध्ये शाळा आणि शिक्षण लक्ष केंद्रित केले गेले होते. चित्रपटात इरफान खानच्या सर्वोत्कृष्ट अभिनया बरोबर पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमरने देखील एक अद्भुत अभिनय निभवला होता. वर्ष 2017 मध्ये आलेले चित्रपट 'हिंदी  मीडियम'चे दिग्दर्शक साकेत चौधरी या चित्रपटाचा भाग नसणार. दिनेश विजान आणि टी-सिरिजचे प्रमुख भूषण कुमार हा चित्रपट तयार करणार आहे. यावेळी, होमी अॅडजानिया चित्रपट दिग्दर्शित करतील. सांगितले जात आहे की चित्रपटाची कथा एक दशक पुढची असेल. या चित्रपटात इरफान खानदेखील दिसतील. 'हिंदी मीडियम'मध्ये इरफान खान चांदनी चौक येथील एका व्यावसायिकाच्या भूमिकेत दिसले असून पूर्णपणे स्वदेशी होते आणि इंग्रजीपासून काही संबंध ठेवत नव्हता. चित्रपटात त्याची बायकोची इच्छा असते की त्यांच्या मुलीला इंग्रजी शिक्षण मिळावे आणि संपूर्ण चित्रपट याच बाबतीत आहे.