1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 डिसेंबर 2018 (00:39 IST)

पहिल्यांदाच बोलली ब्रेकअपबाबत नेहा

break of neha
बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या गोष्टी रोजघडत असतात. कोणाचे तरी अफेअर सुरु होते तर कुणाचं तरी नातं संपतं. ब्रेकअपच्या लिस्टमध्ये आता आणखीन एक नाव सामील झाले आहे ते म्हणजे नेहा कक्कड आणि हिमांशचे. मीडिया रिपोर्टनुसार, दोघांचे नातं संपुष्टात आले आहे. मात्र या मागचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. एवढेच नाही तर दोघांनी एकेमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो देखील केले आहे. नेहा कक्कडने पहिल्यांदाच आपले दुःख सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसह शेअर केले आहे. त्यात तिने म्हटले आहे की, मैंने अपना सब कुछ दे दिया और मुझे बदले में मिला .... मैं शेयर भी नहीं कर सकती की क्या मिला. नेहाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, मला नव्हते माहीत की जगामध्ये इतके वाईट लोकही असतात. आता सगळं गमावून मी जागी झाले आहे. मला माहीत आहे की मी एक सेलेब्रिटी आहे आणि मीही एक माणूसच आहे ना. आज मी पुरती कोलडले आहे म्हणून मला माझ्या फिलिंग्स कंट्रोल करता येत नाहीये. दिल्लीत राहाणार्‍या हिमांश कोहलीने 'यारिया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात नेहाने 'सनी-सनी' हे गाणे गायले होते. याच सेटवर या दोघांची मैत्री झाली होती.