शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 12 डिसेंबर 2018 (12:15 IST)

राधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा

राधिका आपटे मॅजिकल आहे, अशा शब्दात अेरिकेन अभिनेत्री स्टॅना कॅटिकने राधिकाचे कौतुक केले आहे. स्टॅना आपल्याला लवकरच द्वितीय विश्र्व युद्धावर आधारित सिनेमात राधिका आपटेसोबत दिसणार आहे. स्टॅनाच्या मते राधिका आपटेचे काम हे मॅजिकल आहे. तिच्यासोबत काम करताना अतिशय आनंद झाला असून ती खूप खास आहे. म्हणूनच भारतीय प्रेक्षक तिला सर्वाधिक पसंत करतात. आपल्या सिनेमाबद्दल सांगताना स्टॅना म्हणाली की, आम्ही जूनमध्येच सिनेमाचं शूटिंग पूर्ण केले. आता याचे एडिटिंग होत आहे. दुसर्‍या महायुद्धात हेरगिरी करणार्‍या तीन महिलांच्या वास्तविक जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. मी या सिनेमात ब्रिटिश हेरचे कॅरेक्टर साकारत आहे. या सिनेमाकरता आम्ही असाधारण महिलांबद्दल भरपूर वाचन केले. त्याच खर्‍या दुसर्‍या महायुद्धातील नायिका राहिल्या आहेत. राधिकाने सिनेमात भारतीय-ब्रिटिश हेर नूर इनायत खानची भूमिका साकारली आहे. तिचे काम अतिशय प्रभावी असून आपल्याला भारतीय सिनेमात काम करायला अतिशय आवडले असल्याचे स्टॅनाने सांगितले.