बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 12 डिसेंबर 2018 (09:08 IST)

‘बधाई हो’बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक काळ चालणारा चित्रपट

आयुषमान खुरानाचा‘बधाई हो’सलग आठ आठवडे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. कोणतीही मोठी स्टारकास्ट किंवा बिग बजेट नसतानाही या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर १३० कोटींहूनही अधिकची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक काळ चालणारा चित्रपट म्हणून ‘बधाई हो’कडे पाहिलं जातं.
 
या चित्रपटानं आतापर्यंत १३६. ८० कोटींची कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. वेगळ्या कथानकामुळे प्रेक्षकांसह समीक्षकांचाही भरभरून प्रतिसाद ‘बधाई हो’ला लाभला. अमित रवींद्रनाथ शर्मा दिग्दर्शित ‘बधाई हो’हा चित्रपट खूपच साध्या-सरळ पण थेट पद्धतीने एका कुटुंबाची गोष्ट सांगतो. जीतेंद्र (गजराज राव) आणि प्रियंवदा कौशिकी (नीना गुप्ता) या एकमेकांवर नितांत प्रेम करणाऱ्या आणि त्याच सहजप्रेमाने संसाराचा गाडा हाकणाऱ्या या जोडप्याच्या संसारवेलीवर याच प्रेमामुळे तिसरे फूल उमलण्याची वेळ येते. मुलांसाठीही हा धक्का असतो आणि त्यांच्या आजीसाठीही हा तथाकथित सामाजिक चौकटीचा भंग असतो. साधरण अशा वेगळ्याच कथेवर आधारलेला बधाई हो ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झाला होता.