बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 डिसेंबर 2018 (17:17 IST)

सलमानच्या चित्रपटामुळे शेतकरी लखपती

बॉलिवूडचा दबंग खान याचा पडद्यावर काम करण्याचा अंदाजच काही निराळा आहे. त्याचा बहुचर्चित चित्रपट 'भारत' ची सध्या शूटिंग सुरू असून 'रेस' या चित्रपटानंतर सलमान खान याच चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. चित्रपटाचं इंटरनॅशनल शेड्यूल पूर्ण झालं आहे. अली अब्बास जाफरच्या दिग्दर्शनाखाली तयार होणार्‍या या चित्रपटाचं लुधियानात चित्रीरकरण सुरु आहे. कोरिअन चित्रपटाचा रिमेक असणारा चित्रपट रिलीजआधीच वादात अडकला आहे. एका हिंदू संघटनेने चित्रपटाला विरोध केला आहे. झाले असे की, लुधियानात वाघा बॉर्डरचा सेट उभारण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण परिसराला बॉर्डरचे रुप आले आहे. चित्रपटात सीन असल्यामुळे त्या ठिकाणी पाकिस्तानचा झेंडा उभारण्यात आला आहे. नेमका याचाच संघटनेकडून विरोध होत आहे. पाकिस्तानी झेंडा भारतीय भूमीवर उभारला जाऊ नये असे संघटनेचे म्हणणे आहे. याप्रकरणी लुधियाना पोलीस आयुक्तांकडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे. बीएसएफने सुरक्षेच्या कारणास्तव वाघा बॉर्डरवर शूटिंगला नकार दिल्याने लुधियानात सेट उभारण्यात आला आहे. चित्रपटात असे काही सीन आहेत ज्यामध्ये अभिनेत्यांना सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात जायचं असतं. दरम्यान लुधियानात होत असलेल्या चित्रपटाच्या शूटिंगमुळे चार शेतकर्‍यांना फायदा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सेट उभारण्यासाठी चित्रपटाच्या टीमने चार शेतकर्‍यांची 19 एकर जमीन भाड्याने घेतली आहे. प्रत्येक एकराच्या हिशेबाने शेतकर्‍यांना 80 हजार रुपये देण्यात आले आहेत. चारही शेतकर्‍यांना एकूण 15 लाख 20 हजार रुपये मिळणार आहेत. अली अब्बास जाफर दिग्दर्शन करत असलेला हा चित्रपट कोरिअन चित्रपटाचा रिमेक आहे. सलमान खान या चित्रपटात 18 वर्षांपासून ते 70 वर्षांपर्यंतच्या व्यक्तीची भूमिका निभावणार आहे. चित्रपटाचं बजेट एकूण 180 कोटी असल्याचे समजत आहे.