बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. आगामी नाट्य-चित्र
Written By

MAULI TRAILER: 'माऊली'चा ट्रेलर प्रदर्शित, सलमान म्हणाला, रितेशला बघून शिट्टी मारायची

अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी ‘माऊली’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 2 मिनिट 50 सेकंदाचा ट्रेलर खूप शानदार आहे. रितेश यात एका पोलिस अधिकार्‍याच्या भूमिकेत असून ट्रेलरमध्ये जबरदस्त अॅक्शन आणि दमदार संवादांसह रितेश गावातील गुंड्यांची कशी बारा वाजतोय दाखवण्यात आले आहे. 
 
रितेशने ट्रेलर शेअर करत म्हटले आहे की इंस्पेक्टर माऊली सर्जेराव देशमुख म्हणायचं मला. माझ्या सारखा टेरर नाही. एवढेच नव्हे तर स्वत: सलमान खानने देखील रितेशचा ट्रेलर ट्विटरवर शेअर केला. सलमानने मराठी कॅपश्न लिहिले.... सर्वांचा माऊली आणि आमचा भाऊ येत आहे.. एंट्रीवर शिट्टी नक्की वाजवा..
आदित्य सरपोतदारने हा चित्रपट दिग्दर्शित केला असून 14 डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. संगीत अजय- अतुल यांचे आहे.