सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018 (00:24 IST)

दोन खान साथ-साथ?

किंग खान शाहरूख सध्या आपला आगामी चित्रपट 'झीरो'च्या प्रोशनमध्ये व्यस्त आहे. 'झीरो'नंतर किंग खान कोणत्या चित्रपटात दिसणार? याची उत्सुकता चाहत्यांना आतापासूनच लागली आहे. या चाहत्यांसाठी एक खुशखबर ठरू शकते आणि ती म्हणजे शाहरूख व सलमान हे दोन खान फिल्ममेकर संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटात एकत्र येऊ शकतात. 'झीरो'नंतर शाहरूख खान हा अंतराळ यात्री राकेश शर्मा यांच्या बायोपिकवर तयार होणार्‍या 'सारे जहाँ से अच्छा' या चित्रपटात प्रुखम भूकिमा साकारणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेबरोबरच आणखी एका चित्रपटाची चर्चा रंगू लागली आहे. शाहरूखने संजय लीला भन्साळी यांचा एक चित्रपट साईन केला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात किंग खानसोबत सलमान खानही दिसणार असल्याचे समजते. मात्र, याबाबत अद्याप काहीच अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही. संजय लीला भन्साळी यांनी आपल्या आगामी प्रोजेक्टसाठी मला विचारलेले नाही, असे 'झीरो'च्या प्रमोशन कार्यक्रमात बोलताना शाहरूखने सांगितले. मात्र, राकेश शर्मा   यांच्या बायोपिकमध्ये आपण मुख्य भूमिकेत असणार असल्याचे त्याने मान्य केले. किंग खान म्हणाला की, भन्साळी हे अत्यंत चांगले दिग्दर्शक आहेत. त्यांच्याजवळ अनेक नव्या कहाण्या उपलब्ध असतात. मात्र, आगामी चित्रपटाबाबत मला काहीच सांगितलेले नाही. तरीही मला सलमान अथवा आमिर खानसोबत काम करण्याची संधी मिळाली, तर वेळ न दवडता तो चित्रपट मी साईन करेन.