1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
  4. shahrukh thanks to ritesh for adjusting mauli release date

'माऊली'ची माया, 'जिरो'ला दिली जागा

marathi movie
'लय भारी' सिनेमाला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे रितेश देशमुख प्रेक्षकांसाठी 'माऊली' भेटीला घेऊन आला आहे. या सिनेमाचं पहिलं गाणं, माझी पंढरीची माय, हे देखील रितेशने शेअर केल्यानंतर लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया बघायला मिळाल्या. रितेशने आपल्या टीमला टॅग करून हे शेअर केले होते. 
 
लय भारी सारखेच जबरजस्त अॅक्शन आणि डॉयलॉगने सजलेल्या या सिनेमात रितेश एका पोलिस अधिकार्‍याच्या भूमिकेत आहे. यात सैयामी खेर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याआधी चित्रपटाचे टीझर प्रदर्शित झाले तेव्हा शाहरुख खानने ते आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले. 
 
आता अनेकांना प्रश्न पडला होता की शाहरुखने रितेशच्या या चित्रपटाचा टीझर शेअर करण्यामागचे कारण काय? तर त्यामागील कारण अगदी स्पष्ट आहे ते म्हणजे शाहरुख खानच्या जिरो या चित्रपटाशी बॉक्स ऑफिसवर टक्कर टाळण्यासाठी रितेशने माऊलीच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. त्यावेळीसुद्धा शाहरुखने ट्विटरवर इमोशनल पोस्ट शेअर करत रितेशचे आभार मानले होते.
 
14 डिसेंबरला रितेशचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'माऊली' या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले असून निर्मिती जेनेलिया देशमुखने केली आहे. या चित्रपटाला अजय-अतुलच्या संगीताची साथ मिळाली आहे. 
पुढील लेख
आपले मन अथांग आहे