शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. मराठी कलावंत
Written By

काळजात घर करणारा सुबोध भावे

कट्यार प्रमाणेच काळजात घुसून आपले स्थान निर्माण करणारा सुबोध भावे हल्ली तुला पाहते रे ये मालिकेतून घरा-घरात पोहचून आपल्या परिपक्व अभिनयाने मन जिंकत आहे. 43 वर्षाच्या या कलाकाराच्या खात्यात कलाकार आणि दिग्दर्शक म्हणून सुमारे 100 चित्रपट, मालिका आणि नाटक समाविष्ट आहेत. 
 
सुबोध भावे म्हणजे भोळा भाभडा गावकरी ते डॉन तर लोकमान्य टिळक सारख्या महान व्यक्तिमत्त्वाच्या भूमिका देखील अगदी सहज आणि प्रामाणिकपणे परद्यावर मांडणारा अष्टपैलू कलाकार. विनोदी, गंभीर, चरित्र भूमिका असो वा ऐतिहासिक पात्र जिवंत करण्याची पाळी येवो त्याने नेहमी पुढाकार घेतला. स्वत:ला एकाच इमेजमध्ये न बांधता मनोरंजन, ड्रामा, डार्क शेड निवडले. हे आव्हान निश्चित धोकादायक होती तरी ती आपल्या अभिनयाच्या जोरावर पार पाडली. बालगंधर्व सर्वांना अत्यंत आवडले, तर टिळकांच्या भूमिकेत त्याचे सर्वत्र कौतुक झाले. कट्यार काळजात घुसली भोळ्या आणि निष्पाप मनाचा गायक सर्वांच्या हृद्यात शिरला.
 
पुण्याच्या सिंबायोसिस कॉलेजमध्ये असतानाच सुबोध नाटके दिग्दर्शित करीत असत. 2002 पासून मराठी चित्रपटात पाऊल टाकले तेव्हा मराठी इंडस्ट्रीत केवळ 15- 20 चित्रपट निर्मित होत होत्या. तेव्हा घरोघरी टीव्ही आल्यामुळे चित्रपटाकडे लक्ष वेधणे कठिण झाले होते परंतू 2004 मध्ये परिस्थिती बदलली आणि मराठी इंड्रस्टीच्याही लक्षात आले की केवळ मनोरंजनाने नव्हे तर पटकथांमुळे लोकं पुन्हा चित्रपटांकडे वळू शकतात.
 
या काळात काही बोध देणारे तर सोबतच मनोरंजन करणार्‍या चित्रपटांमध्ये सुबोधने आपली ओळख निर्माण केली. इतकी उंची गाठली तर मालिकेत भूमिका करण्यामागे अभिनयाचा रियाझ आणि थेट घरी बसलेल्या प्रक्षेकांच्या हृद्यापर्यंत पोहचण्याची संधी गाठायची हेच असू शकतं. कारण सिनेमात आपल्या आवडत्या अभिनेते रोज घरी पाहण्याची संधी प्रेक्षक देखील गमावू शकत नाही. म्हणूनच खूपच कमी काळात या मालिकेची लोकं रोज आतुरतेने वाट बघत असतात.