रविवार, 27 नोव्हेंबर 2022
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018 (15:44 IST)

‘माधुरी-वय विचारू नका’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘माधुरी-वय विचारू नका’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत, अभिनेता शरद केळकर, संहिता जोशी आणि अक्षय केळकर हे कलाकारही दिसणार आहेत. स्वप्ना वाघमारे जोशीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. याशिवाय ‘माधुरी-वय विचारू नका’ हे चित्रपटाचे मजेशीर नावही चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवत आहे. या चित्रपटातून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर चित्रपट निर्मिती क्षेत्रात पर्दापण करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती मोहसिन अख्तर आणि उर्मिला मातोंडकर प्रस्तुत मुंबापूरी प्रोडक्शनने केली आहे.
 
ट्रेलरमध्ये दाखवल्यानुसार सोनाली ही एका तरुणीची भूमिका साकारत आहे. तरुणांना उद्भवणाऱ्या अनेक चांगल्या-वाईट प्रसंगांना कसे सामोरे जावे, याचे मार्गदर्शन या चित्रपटमधून होणार आहे. या ट्रेलरमध्ये सोनाली विविध प्रसंगामध्ये सामोरे जाताना दिसत आहे. त्याचबरोबर आपण सोनालीसोबत शरद केळकर, संहिता जोशी, अक्षय केळकर आणि विराजस कुलकर्णी यांनी साकारलेल्या पात्रांची झलक देखील ट्रेलरमध्ये पाहू शकतो. हा चित्रपट ३० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.