मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 3 नोव्हेंबर 2018 (09:00 IST)

'नेटफ्लिक्स'चं व्यसन, तरुणावर उपचार सुरु

भारतात पहिल्यांदाच 'नेटफ्लिक्स' या ऑनलाईन व्हिडिओ स्ट्रिमिंग चॅनलचं व्यसन लागल्याचं प्रकरण समोर आलंय. बंगळुरूमध्ये एका तरुणाला या व्यसनाला हॉस्पीटलमध्ये दाखल करावं लागंलय. बंगळुरूच्या राष्ट्रीय मानसिक स्वास्थ्य आणि न्यूरोसाइन्स (NIMHANS)मध्ये सध्या या तरुणावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे व्यसनाची जाणीव झाल्यानंतर या २६ वर्षीय तरुणानं स्वत:हूनच डॉक्टरांना संपर्क केला. 
 
या घटनेत अत्यंत कमी वयातच या तरुणानं आपला व्यवसाय सुरू केला होता. पुढे काही कारणानं व्यवसायही त्याला बंद करावा लागलाय. त्यानंतर कुटुंबाकडून या तरुणावर करिअरवर लक्ष देण्याचा दबाव वाढला. आपला ताण कमी करण्यासाठी या तरुणानं 'नेटफ्लिक्स' व्हिडिओजचा आधार घेतला... पण, तणाव कमी होतोय असं वाटत असतानाच या तरुणाला 'नेटफ्लिक्स'चं व्यसनच लागलं. हा तरुण दिवसातले जवळपास ८-१० तास 'नेटफ्लिक्स' व्हिडिओज पाहण्यात घालवतो.