मंगळवार, 25 मार्च 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 13 ऑक्टोबर 2018 (08:41 IST)

'सेक्रेड गेम्स' चा दुसरा सीझन संकटात

'सेक्रेड गेम्स'चा लेखक वरुण ग्रोवरवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्‍यानंतर आता सेक्रेड गेम्‍सच्‍या दुसर्‍या सीझनवर टांगती तलवार आहे. 'सेक्रेड गेम्स'ची निर्मिती करणारी कंपनी नेटफ्लिक्सचं म्‍हणणं आहे की, सेक्रेड गेम्‍सचा दुसरा सीझन लॉन्च करणार नाही. जरी लॉन्च केलं तरी वरुण ग्रोवरचं नाव दिलं जाणार नाही. 
 
खरंतरं, कॉमेडियन, गीतकार आणि 'सेक्रेड गेम्स'चा लेखक वरुण ग्रोवरचं नाव #MeToo मध्‍ये आलं आहे. त्‍याच्‍या एका ज्‍युनिअर सहकारी महिलेने काही वर्षांपूर्वी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. त्‍यामुळे नेटफ्लिक्स 'सेक्रेड गेम्स'चा दुसरा सीझन रिलीज करायचा की नाही, यावर विचार करत आहे. या वेब सीरीजमध्‍ये अभिनेता सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत आहे.