सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 10 ऑक्टोबर 2018 (15:14 IST)

पूर्ण दिवस मोबाईल....!! फेसबुक...

आजोबा : पूर्ण दिवस मोबाईल....!! फेसबुक...
कंटाळत नाही तू? एवढं काय पडलंय त्यात? 
नातू : अहो आजोबा... एक काम करा, तुम्ही तुमचे जुने मित्र शोधा त्यात... 
आजोबा : अरे ते सगळे माझ्यासोबत तिसरी- चौथी पर्यन्त शिकलेले.....त्या लोकांना हे सगळं कळत असेल का ? 
नातू : अहो, एकदा ट्राय तरी करा....!! 
आणि ८८ वर्षाच्या वयात विठ्ठलरावांचं फेसबुकमध्ये अकाउंट उघडलं....
अर्ध्या तासात चंद्रकांत पाटील, यशवंतराव साळुंके आणि माधवराव लेले यांची फ्रेंड रिक्वेस्ट आली....!! 
विठ्ठलरावांचे डोळे चमकले..... आणि ते म्हणाले...
"अरे लेका जरा बघ की...यात लिलाबाई काळभोर किंव्हा मंदाकिनी चव्हाण, यांचा काही शोध लागतोय का...??"