शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 10 ऑक्टोबर 2018 (11:24 IST)

Birthday Special : 'रेखा'बद्दल 25 रोचक तथ्य

1) 10 ऑक्टोबर 1954 ला जन्म घेतलेल्या अभिनेत्री रेखा तमिळ अभिनेता जैमिनी गणेशन आणि तेलुगू अभिनेत्री पुष्पावली यांची संतानं आहे.   
2) रेखाचा जन्म आणि पोषण चेन्नईमध्ये झाला. जन्मानंतर तिचे नाव भानुमति रेखा ठेवण्यात आले होते.   
3) रेखा तेलुगूला आपली मातृभाषा मानते आणि हिंदी, तमिळ आणि इंग्रेजी उत्तमरीत्या बोलते.   
4) रेखाच्या जन्माच्या वेळेस तिच्या आई वडिलांचे लग्न झाले नव्हते आणि तिच्या वडिलांनी तिला लहानपणी आपली मुलगी म्हणून स्वीकारले नव्हते.   
5) रेखाचे अभिनयात आवड नव्हती पण आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे तिला शाळा सोडून ऍक्टींग करावी लागली.
6) रेखाने 12 वर्षाच्या वयात एक तेलुगू चित्रपटापासून आपल्या करियरची सुरुवात केली. ज्याच्या तीन वर्षानंतर तिनी एका कन्नड चित्रपटापासून नायिका म्हणून काम करणे सुरू केले.   
7) रेखाची पहिले हिंदी चित्रपट अंजाना सफर हो‍ती. त्यात तिच्यासोबत विश्वजित हीरो होते.   
8) रेखाच्या पहिले हिंदी चित्रपट अंजाना सफरमध्ये एक चुंबन दृश्य दिल्या होता त्यामुळे ती चर्चेत आली होती.  
9) रेखा आपल्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये सावळी आणि लठ्ठ होती. तिच्यानुसार तिला अगली डकलिंग (कुरुप बदखाचा पिलू) म्हणण्यात येत होते. 10) रेखाची एक सख्खी बहीण आणि सहा सावत्र भाऊ आहे. ज्यांचे वडील जैमिनी गणेशनच होते.  
11) रेखाला नेहमी जग फिरण्याची इच्छा होती आणि याच कारणांमुळे तिला एयरहोस्टेज बनायचे होते.   
12) रेखाला मेकअपची देखील आवड होती आणि यामुळे तिचे एयरहोस्टेज मित्र तिच्यासाठी परदेशातून मेकअप किट घेऊन येत होती.  
13) कांवेट शाळेत आयरिश ननकडून शिक्षा घेताना रेखाला नन बनायचे होते.  
14) करियरच्या सुरुवातीत रेखाला तेलुगूची बी आणि सी-ग्रेडचे चित्रपट देखील करावे लागले होते. 
15) रेखाने उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले होते. लग्नाचा काही महिन्यानंतरच मुकेशने आत्महत्या केली होती.  
16) फिल्मी करियर दरम्यान, रेखाचे नाव अमिताभ बच्चन, राज बब्बर, विनोद मेहरा, नवीन निश्चल, जितेंद्र, यश कोहली, शत्रुघ्न सिन्हा, साजिद खान आणि अक्षय कुमार यांच्याशी जोडण्यात आले होते.   
17) रेखाचे विनोद मेहराशी लग्न करण्याची चर्चा देखील समोर आली होती पण रेखाने नकार दिला होता.  
18) रेखाचे नाव संजय दत्तशी देखील जोडण्यात आले होते, जो तिच्याशी 5 वर्ष लहान आहे. या बाबत रेखाने एकवेळा म्हटले होते की तिने संजय दत्तशी मैत्री फक्त अमिताभ बच्चनाला त्रास व्हावा म्हणून केली होती.   
19) अमिताभ आणि रेखा एक-दूसर्‍यांचे फार नजीक होते. अमिताभच्या संगतीत रेखाच्या व्यक्तिमत्त्वात फार बदल आहे. ती आपल्या लुकच्या प्रती सजग झाली आणि जीवनातील तिचा दृष्टिकोनच बदलला.   
20) रेखाला डबिंगचा देखील शौक आहे. तिनी नीतू सिंगच्या आवाजात चित्रपट याराना आणि स्मिता पाटिलच्या आवाजात चित्रपट  वारिसमध्ये डबिंग केली होती.
21) रेखाला गाण्याची फार आवड आहे आणि तिने संगीतकार आर डी बर्मनच्या म्हणण्यावर चित्रपट खूबसूरतमध्ये दोन  गाणे गायले आहेत.   
22) रेखाच्या जबरदस्त लुकमागे कोणी स्टाइलिस्ट नाही आहे. ती आपला लुक स्वत: निवडते.   
23) रेखा वेळेची पाबंद आहे आणि सर्व ठिकाण्यांवर वेळेवर पोहोचते.   
24) रेखा आणि हेमा मालिनी आपसात फार चांगल्या मैत्रिणी आहेत.  
25) रेखा अशी पहिली हिरॉइन होती जिने जिम जाणे सुरू होते. रेखाने जिममध्ये बेसिक एक्ससाइजपासून सुरुवात केली होती. ती योगामध्ये माहिर आहे.