शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 10 ऑक्टोबर 2018 (08:45 IST)

स्त्री चित्रपटातील सुंदर अभिनेत्रीचा तोडला होता जबडा #MeToo

सध्या हॉलिवूड प्रमाणे आपल्या बॉलिवूडमध्ये #MeToo या कॅम्पेनद्वारे काळा प्रकार समोर येतो आहे.  अनेक अभिनेत्रींनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा यामध्ये फोडली आहे. सर्वात आधी  अभिनेत्री तनुश्री दत्ता, कंगना रानौत तर  आता ‘स्त्री’ या चित्रपटात ‘चुडैल’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री फ्लोरा सैनी हिचाही समावेश  झालाय. सुंदर दिसणाऱ्या फ्लोराने तिच्यावर  झालेल्या अत्याचाराबाबत आता धीराने वाचा फोडली आहे.या प्रकरणात  निर्माता गौरांग दोषी याच्यावर तिने  गंभीर आरोप केले आहेत. सोबत पुरावा म्हणून फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.फ्लोराने फेसबुकवर एक पोस्ट आणि फोटो शेअऱ केले आहेत. या पोस्टमध्ये तिने म्हटले की, ‘हो, ही मी आहे. 2007 मध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी निर्माता गौरांग दोषी याने मला मारहाण केली होती. त्यावेळी मी त्याला डेट करत होती. मारहाणीमुळे माझा जबडा तुटला होता व फ्रॅक्चर झाले. त्यामुळे  आयुष्यभराचे दुखणे मिळाले. त्यावेळी मी हे सत्य अनेकांना सांगण्याचा प्रयत्न केला परंतु इंडस्ट्रीमध्ये नवीन आलेल्या मुलीवर कोणालाही विश्वास नव्हता.’ तसेच त्याने मला धमकी दिली की मला इंडस्ट्रीमध्ये काम मिळू देणार नाही आणि खरंच तसंच झालं. अनेक चित्रपटांमधून मला बाहेर काढले गेले आहे.  असा आरोप फ्लोराने केला आहे. जर आरोपात तथ्य निघाले तर दोषीला मोठ्या कारवाईस सामोरे जावे लागेल आणि त्याला शिक्षा सुद्धा होऊ शकते.