गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 8 ऑक्टोबर 2018 (09:26 IST)

ट्रोलिंगला वैतागली, अभिनेत्री सोनमच ट्विटर अकाऊंट बंद

sonam kapoor
अभिनेत्री सोनम कपूरसुद्धा या ट्रोलिंगला वैतागून ट्विटर अकाऊंट काही काळासाठी बंद केले आहे. ‘काही काळासाठी मी माझा ट्विटर अकाऊंट बंद करत आहे. इथे खूप जास्त नकारात्मकता आहे,’ असं ट्विट सोनमने केल आहे. काही दिवसांपूर्वीच सोनमने मुंबईच्या रस्त्यांबाबत एक पोस्ट लिहिली होती आणि या पोस्टवरूनच तिला ट्रोल करण्यात आलं होतं.
 
अनेकांनी तिच्यावर  विनाकारण पुरुषांवर आरोप करत असल्याची टीका केली. याआधीही सोनम कपूर अनेकदा ट्रोल झाली आहे. काळवीट शिकारप्रकरणी तिने सलमान खानची पाठराखण करत ट्विट केलं होतं. त्यावेळीही नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं. वारंवार होणाऱ्या ट्रोलिंगला वैतागून अखेर सोनमने ट्विटर अकाऊंट काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.