सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

संजू बाबाकडे महागड्या वस्तूंची रेलचेल

संजय दत्त हे बॉलिवूड सिनेजगतातले प्रसिध्द व्यक्तित्त्व आहे. 141 कोटींची मालमत्ता आणि 15 कोटी रुपये वार्षिक उत्पन्न असणार्‍या या अभिनेत्याला महागड्या वस्तू खरेदी करण्याची आवड आहे. 
 
लक्झरी गाड्यांपासून महागड्या घड्याळांपर्यंत अनेक मौल्यवान वस्तू संजू बाबाच्या संग्रही आहेत. संजय दत्तला महागड्या वस्तू खरेदी करण्याची अतिशय हौस आहे. त्याच्या संग्रही रोलेक्स कंपनीचे 'लेपर्ड डेटोना' हे तब्बल 33 लाख रुपये किमतीचे घड्याळ आहे. संजू बाबाला मोटारसायकल चालविण्याची आवड असून, वीस लाख रुपये किमतीची 'डूकाटी मल्टीस्ट्राडा' मोटरसायकल त्याच्या संग्रही आहे. तसेच 2.56 कोटी रुपये किमतीची फेरारी 599 जीटीबी ही गाडी देखील त्याच्या संग्रही आहे. या गाडीबरोबरच साडे तीन कोटी रुपये किमतीची रोल्स रॉईस घोस्ट ही गाडीही संजय दत्तच्या संग्रही आहे. संजय राहात असलेल बांद्रा, मुंबई येथील आलिशान घराची आजच्या काळामध्ये किंमत तीस कोटी रुपये आहे. सध्या संजय दत्त त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये सहभागी होण्याच्या तयारीमध्ये असून या चित्रपटामध्ये संजयच्या सोबत 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित दिसणार आहे. संजय आणि माधुरी सुमारे दोन दशकांच्या काळानंतर एकत्र पडावर दिसणार आहेत. 'कलंकम' असे या चित्रपटाचे नाव असून कारण आणि धर्मा प्रोडक्शन्स या चित्रपटाचे निर्माते आहेत.