1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 ऑक्टोबर 2018 (09:30 IST)

ऋषी कपूर यांना कॅन्सर, अमेरिकेत उपचार सुरु

cancer of rushi kapoor
अभिनेता ऋषी कपूर यांच्या निकटस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषी कपूर यांना कॅन्सर झाला आहे. हा कॅन्सर तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्याचेही कळतेय. तथापि हा कुठला कॅन्सर आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या ऋषी कपूर सध्या अमेरिकेत उपचार घेत आहेत. पत्नी नीतू कपूर आणि मुलगा रणबीर कपूर त्यांच्यासोबत अमेरिकेत आहेत. याचमुळे आई कृष्णा राज कपूर यांच्या अंत्यसंस्कारालाही ऋषी कपूर हजर होऊ शकले नव्हते.
 
अमेरिकेत ऋषी कपूर ४५ दिवसांचा उपचार सुचवले आहे. यात किमोथेरपी सेशनचाही समावेश आहे. तूर्तास नीतू आणि रणबीर ऋषी कपूर यांच्यासोबत आहे. पण लवकरच रणबीर आपल्या चित्रपटाच्या शूटींगसाठी भारतात परतणार आहे. तो परताच मुलगी रिद्धिमा कपूर अमेरिकेला रवाना होणार आहे. ऋषी कपूर यांच्या आजारपणामुळे तूर्तास जुही चावलासोबतच्या त्यांच्या एका चित्रपटाचे शूटींग थांबवण्यात आले आहे.