बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 1 ऑक्टोबर 2018 (10:49 IST)

'सैराट'नंतर आणखी एका मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक

'सैराट'चा हिंदी रिमेक 'धडक' हिट ठरल्यानंतर आता हिंदी निर्माता - दिग्दर्शकांची पावले मराठी चित्रपटांकडे वळली आहेत. 2011 मध्ये प्रदर्शित झालेला 'मला आई व्हायचेय' चित्रपटाचाही हिंदी रिमेक लवकरच प्रदर्शित होणार आहे.
 
'स्त्री' चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक आणि निर्माता दिनेश विजान हे या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवणार असून त्यांनी दिग्दर्शक समृद्धी पोरे यांच्याकडून कायदेशीररीत्या हिंदी रिमेकचे हक्क घेतले आहेत.
 
लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरूवात होणार आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकार या चित्रपटात भूमिका साकारणार असून त्यांची नावे मात्र आप गुलदस्त्यात आहेत. अ‍ॅड. समृद्धी पोरे यांचा  'मला आई व्हायचेय' चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे. चित्रपटात ऊर्मिला कानेटकरने प्रमुख भूमिका साकारली आहे. सरोगेट मदर आणि तिचे आयुष्य या भोवती हा चित्रपट फिरतो.