गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018 (16:11 IST)

अनुष्का साकारणार जयललितांची भूमिका

बाहुबली चित्रपटातून प्रेक्षकांना भुरळ घालणारी देवसेना अर्थात अनुष्का शेट्टी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर आधारित चित्रपटातून अनुष्का सर्वांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात अनुष्काला 'अम्मा'च्या भूमिकेसाठी विचारण्यात आले आहे. मात्र अद्याप या रोलसाठी ऐश्र्वर्या राय की अनुष्का हे निश्चित  झाले नाही. जयललिता यांच्या जीवनावर आधारित 'अम्मा' या चित्रपटाची निर्मिती सुरू आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी अनुष्का शेट्टीला विचारण्यात आले आहे. अनुष्काशिवाय ऐश्वर्या राय-बच्चनचेही नाव या भूमिकेसाठी आघाडीवर आहे. जयललिता यांचे सहकलाकार आणि राजकीय गुरू अभिनेते एमजीआर यांच्या भूमिकेसाठी कमल हसन किंवा मोहनलाल या दिग्गज अभिनेत्यांची वर्णीलागण्याची शक्यता आहे. जयललिता याचं निधन 5 डिसेंबर 2016 मध्ये चेन्नईत झाले. तळिनाडूमधील राजकारण अनेक वर्षे जयललिता यांच्याभोवती फिरत होते. त्यामुळे या चित्रपटाला लोकांचा मोठा प्रतिसाद लाभेल, यात शंका नाही.