सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

गोविंदा बनणार बाबा रामदेव?

भिनेता गोविंदा सध्या चित्रपट 'रंगीला राजा'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात गोविंदाची प्रुखम भूमिका असून तो विजय मल्ल्याची भूमिका साकारणार आहे. आता याच चित्रपटात गोविंदा दुहेरी भूमिकेत दिसणार असल्याची जोरदार चर्चा आहे. गोविंदा विजय मल्ल्याबरोबरच बाबा रामदेव यांचीही भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. या वृत्ताला आप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. निर्माते पहलाज निहलानी हा चित्रपट आणत आहेत. हा चित्रपट ऑगस्टमध्ये रिलीज होणार आहे. दरम्यान, या चित्रपटातील एका गाण्याचे शूटिंगदेखील पूर्ण झाले आहे. ज्यात बाबा रामदेव आणि अभिनेत्री शिल्पाशेट्टी यांचाही उल्लेख आहे. 'रंगीला राजा'मध्ये गोविंदा आणि निहलानी तब्बल 35 वर्षांनंतर एकत्र काम करणार आहेत. गोविंदा आणि पहलाज निहलानी यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. निहलानी यांनी गोविंदासोबत शोला और शबन, आंखे या सारख्या चित्रपटांतून एकत्र काम केलं आहे. हे दोन्ही चित्रपट हिट झाले होते. गोविंदाच्या भूमिकेविषयी विचारल्यानंतर निहलानी म्हणाले होते, 'या बद्दल मला अनेक लोकांनी विचारलं.
 
मी फक्त इतकंच सांगू शकतो की, सर्वांत मोठा घोटाळा करणार्‍या एका व्यक्तीची भूमिका गोविंदा करत आहे. गोविंदा या भूमिकेसाठी फिट आहे. माझ्या अनेक चित्रपटांत गोविंदाचा डान्स कोरिओग्राफ करणारे चिन्नी प्रकाश यांनी गोविंदाकडून असा डान्स करवून घेतलाय की, फक्त गोविंदाच तो डान्स करू शकतो.' गोविंदा कोरियन चित्रपट 'द टनल'च्या हिंदी रीमेकमध्येही दिसणार आहे. अब्बास मस्तानचा हा चित्रपट असल्याचे समजते.