बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 जुलै 2018 (12:43 IST)

जॅकलिन फर्नांडिस बनली सोशल मीडियाची क्वीन

बॉलिवूडची ग्लॅम डॉल जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियाची क्वीन बनली आहे. नुकताच जॅकलिननं इन्स्टाग्रामवर 20 दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे सगळ्यात कमी वेळात हा आकडा जॅकलिननं गाठला आहे. एवढ्या कमी वेळात कुठल्याच बॉलिवूड स्टारने हा आकडा गाठलेला नाही. जॅकलिन नेहमी तिच्या फॅन्ससाठी इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत असते. त्यामुळेच तिचे फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोपडा यांचे देखील इन्स्टाग्रामवर जवळपास 25 लाखांपर्यंत फॉलोअर्स आहेत. जॅकलिन या गोष्टीने खूप खूश आहे. तिने एक पोस्टदेखील शेअर केली आहे. ज्यामध्ये ती तिच्या चाहत्यांचे आभार मानत आहे.