सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 23 जुलै 2018 (17:22 IST)

रितेशचा 'माऊली' येत्या 21 डिसेंबरला रसिकांच्या भेटीला

रितेश देशमुखचा दुसरा मराठी सिनेमा 'माऊली' हा 21 डिसेंबर 2018 ला रसिकांच्या भेटीला येणार आहे. आषाढी एकादशीचा मुहुर्त साधत सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत खुद्द रितेशने याबाबतची माहिती दिली आहे. 'माऊली' या सिनेमात रितेश भूमिका साकारत असून त्याच्यासह सय्यामी खेर त्याच्या नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार करणार आहे. या सिनेमाची कथा क्षितीज पटवर्धन याने लिहिली असून रितेशची निर्मिती संस्था या सिनेमाची निर्मिती करणार आहे. ‘मुंबई फिल्म कंपनी’ आणि ‘हिंदुस्तान टॉकीज’च्या निर्मितीअंतर्गत साकारल्या जाणाऱ्या या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी अजय- अतुल या जोडीने घेतली आहे.