बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 जुलै 2018 (12:55 IST)

मधुबालावर बनणार बायोपिक

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेंड सुरू असून, हे चित्रपट प्रेक्षकांनाही चांगले भावत आहेत. आपल्या काळातील दिग्गज व प्रख्यात अभिनेत्री मधुबालाच्या आयुष्यावर आधारित चित्रपटही आता बनणार आहे. मधुबालाची छोटी बहीण मधुर बृज भूषण हिने हा बायोपिक बनणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, अनेक फिल्ममेकर्सनी या कल्पनेमध्ये रुची दाखवली आहे, परंतु कोणत्याही दिग्दर्शकाच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. मी एका कन्सल्टंटप्रमाणे चित्रपटाच्या टीममध्ये काम  करेन. चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी सुरू होणार आहे. मधुबालाच्या बायोपिकमध्ये तिच्या आयुष्यातील सर्व चढ-उतार प्रामाणिकपणे दाखवले जाणार आहेत. या बायोपिकमध्ये बहिणीच्या आयुष्यातील सर्व रहस्यांचा उलगडा केला जाणार आहे. हे सर्व अशाप्रकारे दर्शविले जाणार आहे की, त्यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घेतली जाणार आहे. स्टारकास्टविषयी बोलायचे झाले, तर याबाबत अद्याप काहीही फायनल झालेले नाही. दिग्दर्शकाचे नाव फायनल झाल्यानंतरच स्टारकास्टची नावे ठरविण्यात येणार आहेत.